चंद्रपूर | प्रतिनिधी
दुर्गापूर पोलीस हद्दीतून गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ७ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत टाटा-२०७ वाहनासह एकूण ₹६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Seven Cattle Being Cruelly Transported for Slaughter; Local Crime Branch Conducts Swift Raid, Three Accused Arrested
दिनांक २१ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दुर्गापूर हद्दीतून पद्मापूर मार्गे रहमतनगर येथे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अमानुषपणे वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे मौजा पद्मापूर येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान संशयित टाटा-२०७ वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ०५ गाई व ०२ बैल असे एकूण ०७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीने कोंबून निर्दयपणे छळ करत वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन, चंद्रपूर येथे दाखल केले.
या प्रकरणी फिरोज युसुफ कुरेशी (रा. दुर्गापूर), शेख अश्फाक इमाम कुरेशी (रा. रहमतनगर) आणि सादिक याकुब कुरेशी (रा. रहमतनगर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल
०७ गोवंशीय जनावरे – ₹१,०५,०००
टाटा-२०७ वाहन – ₹५,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल – ₹६,०५,०००
स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a Comment