Ads

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही -- काँग्रेसच्या बल्लारपूर शहराध्यक्षा, वकील तथा नगरसेविका अॅड. मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह, अश्लाघ्य व शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करत, त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, सिंदेवाहीच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
Demand for action against Congress leader Medha Bhale for making objectionable statements against Prime Minister Narendra Modi
यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष  छायाताई  हाडगे यांच्या नेतृत्वाखाली सिंदेवाही पोलिस ठाण्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित व्हिडिओची चौकशी करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अॅड. मेधा भाले यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या जबाबदार व्यक्तींनी सामाजिक व सार्वजनिक जीवनातील मर्यादा पाळणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीविषयी अश्लाघ्य व अवमानकारक भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, अॅड. मेधा भाले या वकील असल्याने त्यांच्या वर्तनाची शासनानेही गंभीर दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी छायाताई  हाडगे,
अपूर्वा चिंतलवार , मीनाक्षी दलाल,रक्ष्मी परसावार , अंजली बल्लेवार, शेवंता  सामुसाखरे , प्रतिभा मेश्राम, जयश्री  करकाडे,  चंद्रकला नर्मलवार,  मोहिनी गेडाम ,निताताई परसावार, तनुजाताई रुद्रकार  यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment