Ads

भद्रावतीत गांजा विक्रीचा पर्दाफाश! घरातून ६२० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त, आरोपी अटकेत

भद्रावती प्रतिनिधि /जावेद शेख (ता. १८ जून २०२६) – भद्रावती शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. आरोपीच्या राहत्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६२० ग्रॅम गांजा आणि मोबाईलसह १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Bust of cannabis sale in Bhadrawati! 620 grams of narcotic substance seized from house, accused arrested.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरूनगर परिसरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी गुरूदास उर्फ चेतन भास्कर पोईनकर (वय २३) याच्या घरातून गांजा विक्रीसाठी साठवलेला असल्याचे उघड झाले. आरोपी हा पान टपरीवर काम करत असताना मागील काही दिवसांपासून गुप्तपणे गांजाची विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹६,००० किमतीचा गांजा आणि ₹१०,००० किमतीचा मोबाईल असा एकूण ₹१६,००० चा मुद्देमाल जप्त केला. तपासात हा गांजा त्याचा साथीदार ईशांत उर्फ खवलू मानकर याच्यासोबत संगनमत करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भद्रावती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करत आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात 
सपोनि दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार स्वामी चालेकर, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, किशोर वैरागडे, अजय बागेसर, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, महिला पोलीस अंमलदार पुजा पंधरे, चालक दिनेश अराडे व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment