Ads

🐅 चिमूरच्या बरंडघाटात वाघाचा पुन्हा हल्ला! शेतकरी जागीच ठार; मानव-वन्यजीव संघर्षाचा २३ वा बळी

चिमूर, दि. ७ जुलै :
चिमूर तालुक्यातील बरंडघाट वनपरिक्षेत्रात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील कामासाठी जंगलालगत गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  Tiger attacks again in Chimur's Barandghat! Farmer killed on the spot; 23rd victim of human-wildlife conflict
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे बरंडघाट व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, जंगलालगत गस्त वाढवावी तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत आणि शासकीय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment