Ads

🚨 धोकादायक पार्किंग महागात! भद्रावतीत दोन ट्रकचालकांना कोर्टाकडून दंड व शिक्षा

भद्रावती | प्रतिनिधी | जावेद शेख :-
नागपूर–चंद्रपूर मुख्य मार्गावर वाहने धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उभी करून इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांवर भद्रावती पोलिसांनी जलद कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ₹2,500 दंड आणि न्यायालय उठेपर्यंत कारावास अशी शिक्षा सुनावली. Dangerous parking is expensive! Two truck drivers in Bhadravati fined and sentenced by court
भद्रावती पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेने वाहतूक व्यवस्थापन आणि नियंत्रण मोहिमेदरम्यान १ जुलै व ३ जुलै २०२६ रोजी ही कारवाई केली. या प्रकरणात सुनिल तेजराव भुक्या (वय २७, रा. बरांज तांडा, ता. भद्रावती) आणि चंद्रशेखर मुराहु यादव (वय ३७, रा. आरी पहाडपूर, उत्तर प्रदेश) यांनी आपापली वाहने नागपूर–चंद्रपूर मुख्य मार्गावर धोकादायकरीत्या उभी करून अपघाताचा धोका निर्माण केल्याचे निष्पन्न झाले.
या दोन्ही चालकांविरुद्ध कलम १२५, भारतीय न्याय संहिता (BNS-2023) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर ३ व ४ जुलै २०२६ रोजी भद्रावती न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत कलम २७५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत प्रत्येकी ₹२,५०० दंड, न्यायालय उठेपर्यंत कारावास आणि दंड न भरल्यास चार दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार लेकेश नायडू, राकेश बंजारीवाले तसेच पोलीस अंमलदार अंकुश खंडाळे, नितेश गुडधे आणि सतीश कसारे यांनी सहभाग घेतला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment