Ads

तीन वर्षांनंतर लागला शोध! हैदराबादहून अल्पवयीन मुलगी सुरक्षित ताब्यात; AHTU/LCB चंद्रपूरची उल्लेखनीय कामगिरी

चंद्रपूर, दि. ९ जुलै :
तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात AHTU/LCB चंद्रपूर पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा छडा लागला असून तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.Search begins after three years! Minor girl from Hyderabad safely taken into custody; Remarkable achievement of AHTU/LCB Chandrapur
पोलीस स्टेशन गडचांदूर येथे अप. क्र. 291/2024 अंतर्गत कलम 137(2) व 143 (BNS) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान संबंधित अल्पवयीन मुलगी हैदराबाद येथे नोकरी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे दि. ९ जुलै २०२६ रोजी AHTU/LCB चंद्रपूर पथकाने मुलीशी संपर्क साधला. तिचा विश्वास संपादन करून तिला तिच्या राहत्या घरी बोलावण्यात आले आणि सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया व तपासासाठी संबंधित अल्पवयीन मुलीला गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, AHTU/LCB चंद्रपूर पथकाच्या तत्परता, तांत्रिक तपास आणि समन्वयाचे कौतुक होत आहे.
कारवाई पथक : AHTU/LCB, चंद्रपूर.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment