जावेद शेख /भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावती शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत विविध विकास कामे रखडलेली असून, शहर व महामार्गावरील मुख्य रस्त्याची दैना अतिशय गंभीर आहे. मानोरा फाटा ते भद्रावती बसस्थानक पर्यंत चंद्रपूर नागपूर हाय वे वर जागोजागी खड्डे पडले असून सा. बां. उपविभागाद्वारे तात्पुरते डांबर लावून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु सदर डागडुजीमुळे रस्ता सपाट न होता जागोजागी डांबराचे उंचवटे तयार झाले असून,या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे.तसेच श्रीराम नगर ते NTPC पर्यंतच्या सर्व्हिस रोड चे काम मागील एक ते दीड वर्षापासून रखडलेले आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावीत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भद्रावती शहर व तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी आज दिनांक १४/०७/२०२६ रोजी निवेदन घेऊन गेले असता एकही जबाबदेय अभियंता किंवा अधिकारी कार्यालयात हजर नव्हता.
सदर कामे लवकरात लवकर पूर्ण न करून दिल्यास वंचित बहुजन आघाडी भद्रावती शहर व तालुका तर्फे सा. बां.उपविभाग कार्यालय भद्रावती समोर तीव्र निदर्शने व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य कुशलभाऊ मेश्राम, जिल्हा महासचिव डॉ.अमित नगराळे, तालुका अध्यक्ष राजरत्न पेटकर, महिला तालुका अध्यक्षा संध्याताई पेटकर, सल्लागार लताताई टिपले, शहर अध्यक्ष स्वप्नील कोल्हटकर, सल्लागार विजय इंगोले, अनुराग खाडे, असित सूर्यवंशी, सतीश म्हस्के, गमतीदास रायपुरे, विशाल कांबळे इत्यादी उपस्थितीत होते.
0 comments:
Post a Comment