सिंदेवाही -- सिंदेवाही तालुक्यात दिनांक 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ स्तरावर तसेच नगरपंचायत स्तरावर सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Self-Satisfaction Camp organized in Sindewahi Taluka या शिबिराचे आयोजन मोहाळी नलेश्वर येथे दिनांक 7 मार्च, रत्नापूर येथे 14 मार्च, लोणवाही येथे दि.10 एप्रिल, पळसगाव जाट येथे दिनांक 17 एप्रिल आणि सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे दिनांक 8 मे रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, क्रिमिलियर, डिजिटल सातबारा, ई-मोजणी, ऍग्रीस्टॅक, पीएम किसान, ई हक्क, संजय गांधी योजना, महसूल कायद्याबद्दल जागृती तसेच मूलभूत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंदेवाही तहसीलदार विजया झाडे यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment