भद्रावती जावेद शेख :
तालुक्यातील घोसरी येथील रहिवासी श्री. भानुदास राजाराम कुलमेथे यांचे बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात आणि पोलीस पाटील वर्तुळात शोककळा पसरली आहे.
आज त्यांच्या स्वगावी घोसरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.स्व. भानुदास कुलमेथे यांच्या अंत्यविधीला भद्रावती तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुःखद निधनानंतर महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना, तालुका भद्रावती यांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ स्व. कुलमेथे यांच्या पत्नीला सानुग्रह निधी देऊन आर्थिक मदत करण्यात आली.या दुःखद प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी व पोलीस पाटीलांनी कुलमेथे कुटुंबाचे सांत्वन केले. "ईश्वर कुलमेथे परिवाराला या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो," अशी प्रार्थना सर्वांच्या वतीने सामूहिकरित्या करण्यात आली.याप्रसंगी प्रामुख्याने पोलीस उपनिरीक्षक (ASI) श्री. भारत सोयाम, पोलीस पाटील संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. योगेश मत्ते, भद्रावती तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्रजी पोइनकर, महिला जिल्हा संघटक सौ. सुनिता ठोंबरे यांच्यासह भद्रावती तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment