जावेद शेख, प्रतिनिधी भद्रावती :
भद्रावती शहरात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या पिकअप मालवाहू वाहनावर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी धडाकेबाज कारवाई करत वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले. या कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
“SDO Sandeep Bhaske's crackdown on sand mafia! Pickup truck transporting illegal sand seized”
गोपनीय माहितीच्या आधारे शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 वाजता वृंदावन सभागृह परिसरातून जात असलेल्या एका पिकअप मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात सुमारे एक ब्रास अवैध रेती आढळून आली. त्यानंतर संबंधित वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
MH34 BZ 9303 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात आली. सदर वाहन गजानन पिंपळकर (रा. जेना) यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मंडळ अधिकारी मनोजकुमार भोयर, ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक, वामन राजूरकर, ताराचंद खोब्रागडे यांना पाचारण करून पुढील कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या या धडक कारवाईमुळे भद्रावती परिसरात अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाचा अंकुश बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.
0 comments:
Post a Comment