भद्रावती /जावेद शेख:-भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या चर्चा सुरू असतानाच महसूल विभागाने पहाटे कारवाई करत मौजा कुणाडा येथे चारगाव घाट परिसरातील रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
Early morning 'bold' action by the Revenue Department in Kunada? Manoj Nandi's tractor filled with sand seized
भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. कारवाईदरम्यान फुकट नगर, भद्रावती येथील मनोज नंदी यांचे ट्रॅक्टर विनापरवाना रेती वाहतूक करताना आढळल्याने ते जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या कारवाईत मंडळ अधिकारी तथा गौण खनिज पथक प्रमुख अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुरकुटे, तसेच महसूल कर्मचारी खुशाल तुरारे, राहुल भोंगळे आणि बंडू वेलफुलवार सहभागी असल्याचे सांगितले जाते. जप्त ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सकाळी महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्रत्यक्ष व्यक्तिगत व्हॉट्सअॅपवर कारवाईचा फोटो पाठविण्यात आला. फोटोवर GPS Map Camera द्वारे भद्रावती, महाराष्ट्र आणि पहाटे ३.३३ वाजताची वेळ नोंद दिसत असल्याने ही कारवाई पहाटेच झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील रेती घाटांची पाहणी करून पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते.
तरीही दुसरीकडे मांगली (रै) नाल्यासह काही नदी-नाल्यांमधून चारगाव घाट, कोंडाणाला, वाघेडा,रात्री ट्रॅक्टरची ये-जा सुरू असल्याच्या चर्चा स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच सवाल ऐकू येत आहे
या रेती घाटावर 4 रेती तस्करांचे साम्राज्य आहे त्यापैकी एक मासा गळाला लागा आहे
दरम्यान, रात्री सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या हालचालींचा नेमका प्रकार काय, याबाबत स्थानिकांकडून विविध माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाचा पुढील भाग लवकरच…
— दि चंद्रपूर टाइम्सचा दणका :
भद्रावती तालुक्यातील रेती तस्करीच्या हालचालींवर दि चंद्रपूर टाइम्स सातत्याने लक्ष ठेवून असून या प्रकरणातील पुढील घडामोडी लवकरच उघड केल्या जाणार आहेत.
0 comments:
Post a Comment