Ads

प्रसिद्ध सोन्याच्या दुकानदाराकडून ग्राहकाची फसवणूक

भद्रावती जावेद शेख(तालुका प्रतिनिधी):शहरातील प्रशिद्ध सोन्याच्या दुकानदाराविरुद्ध स्वरूप मेश्राम या ग्राहकाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती कडे फसवणुकीची लिखित तक्रार दिली होती.
Customer cheated by famous gold shopkeeper
     प्राप्त माहितीनुसार, स्वरूप मेश्राम यांच्या आई संध्या मेश्राम यांनी डिसेंबर २०२३ पासून प्रति महिना ५,०००/- याप्रमाणे ११ महिने कालावधीची आर.डी. काढली होती. अकरा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला ११ महिन्याचे ५५,०००/- आणि बाराव्या महिन्याचे पाच हजार रुपये हे सोने दुकानदार स्वतः देणार असे एकूण ६०,०००/- दुकानदाराने बाराव्या महिन्यात ग्राहकाला देण्याचे कबूल केले होते. बारा महिने झाल्यानंतर डिसेंबर २०२४ मधे ग्राहक दुकानदाराकडे जमा रक्कमेची मागणी करण्यासाठी गेला असता ग्राहकाला सलग दोन वर्ष उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले आणि ग्राहकाचा फ़ोन पण घेणे बंद केले. दुकान  सतत बंद असल्यामुळे ग्राहकांने त्रासून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे धाव घेतली.
     ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांनी संबंधित सोने दुकानदारासोबत संपर्क साधून ग्राहकाच्या तक्रारीची तसेच ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई ची माहिती दिली. यावर दुकानदाराने ग्राहकांना ४०,०००/- चा धनादेश दिला तो ग्राहकाच्या खात्यात जमा झाला, १०,०००/- किमतीचे सोने दिले आणि उर्वरित दहा हजार रुपये एका आठवड्यात देण्याचे कबूल केले.
     ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूळ दोन वर्षापासून थांबलेले पैसे तात्काळ मिळाले यामुळे मेश्राम परिवार आनंदी असून त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आभार मानले आहे.
———————————————

ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नियमित कार्य करीत आहे. तरी देखील ग्राहकाने सजग राहावे. आर. डी. काढतांना ग्राहकाने नेहमी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडूनच आर. डी. काढा. आरडी चे पासबुक किंवा इतर कागद नेहमी अपडेट आणि सांभाळून ठेवा. फसवणूक झाल्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्र सोबत संपर्क करा.
-प्रवीण चिमूरकर, अध्यक्ष,
 ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment