चंद्रपूर : शहरातील इंदिरानगर परिसरातील कालीशाबाबा मस्जिद येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक नितेश गवळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक गवळी यांनी तातडीने रामनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून तो अंदाजे मध्यमवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
0 comments:
Post a Comment