Ads

माझ्या कार्यकाळात क्रीडा संकुल अद्यावत बनविणार -आमदार प्रतिभाताई धानोरकर.

During the tenure, sports complex will be updated - MLA Pratibhatai Dhanorkar
भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
मी माझ्या उरलेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात तालुका क्रीडा संकुलाला अद्यावत बनवून हे संकुल सर्व प्रकारच्या सुविधांनी शहरातील तालुका तथा शहरातील विविध क्षेत्रातील खेळाडूसाठी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी खेळाडूंना दिली .शहरातील तालुका कि्डा संकुलात 14 वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय रगबी बॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर वेकोली मांजरी क्षेत्राचे महाप्रबंधक गुप्ता, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे, डॉक्टर बी प्रेमचंद, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय चौरशिया ,राजु गुडावार,अँड.मिलिंद रायपुरे,,राकेश तिवारी पालिकेचे नगरसेवक आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती सदर स्पर्धेचे आयोजन रगबी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा चंद्रपूर जिल्हा रगबी असोसिएशन तर्फे करण्यात आले असून राज्यातील 36 सघाने या स्पर्धेत भाग घेतला असुन या स्पर्धेतून हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड केल्या जाणार आहे निवड झालेल्या संघाचा प्रशिक्षण कार्यक्रम याच संकुलात 28 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान होणार असून हा संघ चार तारखेला हैदराबाद साठी रवाना होणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment