Ads

भर चौकात युवकांच्या हत्याने घुग्घुस शहर हादरले

घुग्घुस :-
जिल्ह्यात शिव जयंती चा उत्साह सुरू होता तर एकीकडे थरारक घटनेत युवकाचा गळा कापण्यात आला.
सदर घटना घुग्घुस येथे घडली.

रात्री 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया समोर 25 वर्षीय कादर शेख या युवकाचा डोळ्याघुग्घुसत मिरची पावडर फेकत काही युवकांनी हल्ला चढविला. Crime news
कादर जमिनीवर पडला असता मारेकऱ्यांनी त्याच्या गळ्यावर वार करीत ठार केले.
मृतक कादर काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता, कादर वर खून प्रकरणी सहभागी असल्याचा आरोप होता. Murder
काही दिवसांनी बँक ऑफ इंडिया समोर कादर ने हातात तलवार घेत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता.
या हत्येचं नेमकं कारण काय? कादर चे मारेकरी कोण याचा तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
ऐन शिव जयंती च्या उत्साहात भर चौकात अशी हत्या म्हणजे पोलिसांना आव्हान देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न आहे, ज्या ठिकाणी कादर ने तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली.
सदर घटनेचा तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment