भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत नगर परिषद भद्रावती मार्फत शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच सन 2022 मध्ये होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण | व गाझी वसुंधरा अभियानबाबत जनजागृती होण्याकरीता विविध प्रकारच्या स्पर्धा जसे काव्य स्पर्धा, पोस्टर ड्राईंग स्पर्धा, चलचित्रपट स्पर्धा, पढनाट्य स्पर्धा दिनांक 15 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 10 डिसेंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती.
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण मा. ना. श्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री नगर विकास विभाग, आदिवासी विभाग, उर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सवत व पुर्नवसन यांचे हस्ते पार पडले. ते भद्रावती शहरात तिन दिवसाचे दौ-या निमित्त आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार श्री सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर, चंद्रपुर वरोरा आर्णी निर्वाचन क्षेत्र मा. आमदार सौ. प्रतिभाताई सुरेश धानोरकर, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र उपस्थित होते. सदर बक्षिस वितरण समारंभालण्याचे स्वागत व प्रताबिक शहराचे नगराध्यक्ष श्री. अनिलभाऊ धानोरकर यांनी शाल, श्रीफळ, एतिहासिक भद्रावती शहरांची माहिती पुस्तिका व ग्रामोद्यय संघ येथे इन्तकलेतून तयार केलेली वस्तु भेट देऊन करण्यात आले.
सदर स्पर्धेचे विषय 1) शहरातील स्वच्छता हि माझी जबाबदारी • 2) कोरोना काळात स्वच्छतेचे महत्त्व 3) स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती माझी संकल्पना 4) माझी बत्तुधरा माझी जबाबदारी इ. होते. त्यानुसार काव्य स्पर्धा मध्ये श्री प्रकाश मिळकर, सौ छाया रविन्द्र मिनमिले, खुशालदास कामडी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतिय क्रमांक प्राप्त झाला. नलचित्रपट स्पर्धांमध्ये सप्तश्रृंगी कलामंच, निळकंठराव शिंदे विद्यालय, सौ. छाया रविंद्र मिलमिले यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतिय क्रमांक प्राप्त झाला. पटनाय स्पर्धा मध्ये गुरुदेव सेवा मंडळ आणी राष्ट्रधर्म युवा मंच, पंतजली योग, राजेश हजारे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतिय क्रमांक प्राप्त झाला. पोस्टर ड्राईंग स्पर्धा मध्ये तिन वयोगट करण्यात आले होते त्यातील वर्ग 5 ते 7 मध्ये माही संजय जांमुळे, किरण बळीराम पिंपळकर, शाहिन सुभान पठान यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतिय क्रमांक प्राप्त झाला. वर्ग 8 ते 10 मध्ये प्रणची सुनिल भावे, कोमल ओमप्रकाश आखाडे, स्विटी वाशिष्ट राजभर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतिय क्रमांक प्राप्त झाला वर्ग 10 व त्यापुढील वयोगटात संजना बी निरांजने, कोमल आर डाले, यामिनी ले मारापेल्ली यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतिय क्रमांक प्राप्त झाला. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे विजेत्यास रोख रु.2500/- द्वितिय क्रमांकाचे विजेत्या रोख रु.1500/- तृतिय क्रमांकाचे विजेत्यास रोख रु. 1000/- व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणुन श्री. रविंद्र तिराणिक व श्री रमेश खातखेडे यांनी पाहले.
सोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत शहरातील सर्व आस्थापना, शाळा, कार्यालय, रुणालय, निवासी संकुल इ. ची स्वच्छा रैकिंग स्पर्धा घेण्यात आली होती त्यातील विविध वर्गवारीचे निकाल यावेळी जाहिर करण्यात आले. त्यानुसार स्वच्छ हॉटेल वर्गवारीमध्ये हॉटेल आलिशान, स्वच्छ शाळा वर्गवारीमध्ये सेंट अॅनिस विद्यालय, स्वच्छ रुग्णालय वर्गवारीमध्ये शिंदे मल्टीस्पेशालीटी रुग्णालय, स्वच्छ निवासी संकुल वर्गवारीमध्ये जैन मंदिर व स्वच्छ शासकिय कार्यालय या वर्गवारीमध्ये पोलिस स्थानक भद्रावती यांना सर्वाधिक गुण मिळाले. सर्व विजेत्यास प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले..
यावेळी समारंभात नगर परिषद भद्रावतीचे उपाध्यक्ष श्री संतोषभाऊ आमने, मुख्याधिकारी श्री सुर्यकांत पिदुरकर, श्री सुधीरभाउ सातपुते, प्रफुलभाऊ चटकी, सर्व पदधिकारी सर्व नगर परिषद कर्मचारी व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री रविंद्र गड्डमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी श्री सुर्यकांत पिदुरकर यांनी केले.
0 comments:
Post a Comment