Ads

भद्रावती तालुक्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका; ४ आरोपी ताब्यात, ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती (प्रतिनिधी) जावेद शेख :
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी मुखबीरामार्फत माहिती मिळाली की, मौजा पिरली, ता. भद्राजावेदवती येथील काही इसम ५२ तास पत्त्यांवर पैशाची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत आहेत. सदर माहितीच्या आधारे भद्रावती पोलीस स्टेशनचे अधिकारी व पंचांसह घटनास्थळी दाखल झाले.Police raid gambling den in Bhadravati taluka; 4 accused arrested, valuables worth Rs 4.29 lakh seized
पोलिसांनी मौजा पिरली येथे सापळा रचून जुगार खेळणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती आरोपींनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली—
घनश्याम शेषराव उत्ताने (वय ५०), रा. मांगली, ता. भद्रावती
दिपक नथ्थूजी बोथले (वय ३३), रा. वाघेडा, ता. भद्रावती
मारोती उर्फ नंदकिशोर महादेव झाडे (वय ४२), रा. पिरली, ता. भद्रावती
हनुमान ज्ञानेश्वर देठे (वय ३५), रा. पिरली, ता. भद्रावती
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत व घटनास्थळावरून एकूण ४ लाख २९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात आरोपींकडून रोख रक्कम ३,१६० रुपये, डावावर ठेवलेली १,२५० रुपये, सहा मोटारसायकली (किंमत अंदाजे ४,२५,००० रुपये) तसेच ५२ तास पत्ते (१०० रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आरोपी क्रमांक १ ते ४ तसेच फरार आरोपी वाहनचालक क्रमांक ३ ते ७ यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा क्रमांक /२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकूलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आदी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment