जावेद शेख भद्रावती प्रतिनिधि, :-
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत चंद्रपूर वनवृत्तामध्ये कार्यरत असलेले भद्रावतीचे वनपाल विकास विश्वासराव शिंदे यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय वन अधिकारी कार्यालयामार्फत गौरव करण्यात आला.Forester Vikas Shinde praised for excellent work
वन संरक्षण व वन संवर्धनाच्या अनुषंगाने नेमून दिलेल्या क्षेत्रीय व कार्यालयीन कामकाजामध्ये शिंदे यांनी कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठा व जबाबदारीने उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या या योगदानाची दखल घेत विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र शील्ड प्रदान करून गौरविण्यात आले.
वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन तसेच विभागीय कामकाजामध्ये त्यांनी दाखविलेली तत्परता व प्रामाणिकपणा इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या गौरवामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.त्यांच्या या कार्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे,ए.आर.पठाण आदींनी अभिनंदन केले.
0 comments:
Post a Comment