Ads

महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघातर्फे "मराठी भाषा पंधरवडा निमित्याने विविध स्पर्धांचे आयोजन.

राजुरा ३० जानेवारी :-
     महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ तालुका राजुरा तर्फे दिनांक १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
Maharashtra Marathi Secondary Teachers Association organized various competitions on the occasion of "Marathi Language Fortnight".वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य लेखन घेण्यात आले. प्रत्येक शाळा स्तरावर या स्पर्धा घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून घनश्याम पटले, अध्यक्ष, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ, गोंदिया यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ओमप्रकाश गोंड,तहसीलदार राजुरा, मनोज गौरकार, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जी.प. चंद्रपूर , रजनी शर्मा, सह संपादक आपला महाराष्ट्र मराठी अध्यापक , विजयकुमार लांडगे मार्गदर्शक, दूधराम राऊत कार्यवाहक, भरत गावडे कार्यकारी अध्यक्ष, डॉ. मंजुषा सावरकर उपाध्यक्ष , रामकृष्ण रोगे, योगेशकुमार रहांगडाले, संपादक, आपला महाराष्ट्र मराठी अध्यापक, गोंदिया आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निबंध व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या अनुक्रमे स्टेला मॉरीस स्कूल बामणवाडा स्टेट च्या क्रीष्णा संदीप डाहूले, माही विनोद दुरुडकर आणि सीबीएसई च्या श्रद्धा मनोहर वाघमारे, श्रुती अंबादास जाधव, आदर्श हायस्कूल च्या सिद्धी सुरेश वडेट्टीवार, निधी दिलीप चापले, द न्यू एरा स्कूल च्या स्वाती चौधरी, श्रावणी माकोडे, सोनिया गांधी स्कूल येथील नंदकिशोर पोलका, प्रेरणा तोराम, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील दिपाली राजू कोडापे, दिव्या प्रकाश गावंडे, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल स्टेट येथील हेम बेलसरे, आस्था चांदेकर, सीबीएसई च्या कोमल गोहणे, नम्रता बोहरे आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या सह कार्यवाह जयश्री धोटे यांनी केले.  तर प्रास्ताविक सदस्या संगीता राठोड यांनी केले. आभार बादल बेले, कार्यवाह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
--------------------------------------------
मराठी भाषा पंधरवड्यातील विविध स्पर्धांमध्ये या शाळांनी घेतला सहभाग
आदर्श हायस्कूल राजुरा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा, द न्यू एरा इंग्लिश स्कूल, स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट बामणवाडा, सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल राजुरा, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुरा, जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा, शिवाजी हायस्कूल राजुरा व चुनाळा 
_______________________________
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment