Ads

पो.स्टे. नागभिड हद्दीत 30 गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोघे अटकेत

चंद्रपूर, दि. 30 जानेवारी 2026 — स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन नागभिड हद्दीत ट्रक क्रमांक CG-24-S-7667 वर छापा टाकून गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक उघडकीस आणली. सदर वाहनातून एकूण 30 नग गोवंश (गाय, बैल व गोरे) आढळून आले. प्राण्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ सुटका करून त्यांना मौजा लाखनी, जि. भंडारा येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
Inhumane and illegal transportation of 30 cows exposed in Nagbhid area of ​​Po. Station; Local Crime Branch takes action, two arrested
या प्रकरणी पोलीस स्टेशन नागभिड येथे अप. क्र. 67/2026 अन्वये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा, 1960 चे कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, 1976 (सुधारित 2015) चे कलम 5(अ), 9, 11 आणि भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 3(5), 49 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त मालामध्ये ट्रक क्र. CG-24-S-7667, दोन मोबाईल फोन व 30 नग गोवंश असा एकूण अंदाजे ₹32,60,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी प्रदीप बाळकृष्ण वाटघुरे (वय 33, रा. देवरी, जि. गोंदिया)
रिजवान अहमद अब्दुल रऊफ कुरेशी (वय 28, रा. दारव्हा, जि. यवतमाळ)
यांना अटक केली आहे.
तर मोहम्मद जमील कुरेशी (रा. नागपूर) व मोहम्मद साकिब खान (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई उपविभाग ब्रम्हपुरी पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास पोलीस स्टेशन नागभिड करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment