वरोरा/ जावेद शेख : आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी वरोरा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रामपुर अंतर्गत शिंदोला गावात वनविभागाने मोठी कारवाई करत तब्बल 15.00 हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले.
Major Operation in Warora Forest Range! 15 Hectares of Encroached Land Leveled by JCB; Forest Offenses Registered Against 13 Encroachers.
सदर प्रकरणात 13 अतिक्रमण धारकांना पूर्वसूचना देऊन जमिनीबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी कोणतेही वैध पुरावे सादर न केल्यामुळे वनविभागाने त्यांच्यावर वनगुन्हा नोंदवून कारवाई केली.
यानंतर आज सकाळी ट्रॅक्टर व JCBच्या साहाय्याने कक्ष क्र. 7 अ मधील संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटवलेल्या जागेवर गावकऱ्यांच्या मागणीनुसार ‘वैरण विकास (गवती कुरण)’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध होणार असून दुग्ध व्यवसायालाही चालना मिळणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
ही संपूर्ण कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये डी. बी. चांभारे (क्षेत्र सहाय्यक, टेमर्डा), जे. के. लोणकर (क्षेत्र सहाय्यक, शेगाव), आर. पी. राठोड (क्षेत्र सहाय्यक, वरोरा), व्ही. एम. ढुमणे (वनपाल), पी. आर. ब्रम्हणात (वनरक्षक, रामपुर) तसेच इतर वनकर्मचारी, पोलीस पाटील, सं.व.व्य.स. अध्यक्ष व PRT सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वनविभागाच्या या कठोर कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0 comments:
Post a Comment