Ads

भटाळी येथे राष्ट्रवादी स्वच्छता अभियानाला सुरुवात

भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकांमध्ये रमणारा पक्ष असून सच्चा कार्यकर्ता हा या पक्षाची पुंजी आहे. जो कार्यकर्ता नेत्याच्या मागे लागून लागून आपल्या भागातील जनतेला न्याय देतो तो सच्चा कार्यकर्ता असतो, असे उद्गार नगरविकास ऊर्जामंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील भटाळी येथील राष्ट्रवादी स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भद्रावती तालुका तर्फे राष्ट्रवादी स्वच्छता अभियान शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटाळी येथे करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य , भटाळी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर ,महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, माजी सरपंच श्रीकृष्ण वनकर ,नंदोरी सरपंच शरद खामनकर व अन्य अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पूर्ण गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. जणू काही संपूर्ण गाव नववधू सारखे नटले होते.
प्रथम झाडूचे पूजन करण्यात आले नंतर रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रिया रासेकर ,द्वितीय काजल सातपुते, तृतीय दामिनी मडावी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या कामाचे प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. तसेच दिलेल्या निवेदनात नमूद केलेली कामे पूर्णत्वाला जाईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन मोतीलाल झाडे तर आभार मुनाज शेख यांनी मानले.
याप्रसंगी उपसरपंच दीपक मडावी, सदस्य नीलिमा रोहन कर, सविता झाडे, गीता ताजणे, जोशना तुरारे, नरेश वानखेडे तसेच ज्येष्ठ नागरिक विठ्ठल तुरारे, विलास सातपुते,
कविता उरकुडे, सविता देवतळे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment