Ads

आश्वासनांपासून पळ काढणारा निराशाजनक अर्थसंकल्प ; आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर :-असत्य कथन करणारा, मागील अर्थसंकल्पाची 'कट पेस्ट" असलेला महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. निधीचे नियोजन करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ आकड्यांचा खेळ करून, महाविकास आघाडीने महामानवांच्या फोटोसह जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांपासून पळ काढणारा निराशाजनक असा हा अर्थसंकल्पA disappointing budget that escapes promises; Come on. आहे. कॉपी केल्यानंतर जशी रस्टिकेट ची शिक्षा असते, तसेच महाराष्ट्रतील जनता या सरकारला रस्टिकेट केल्याशिवाय राहणार नाही.विकासाचा कोणताही ठोस संकल्‍प नसलेला, अर्थहीन, दिशाहीन व राज्‍याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्‍प अर्थमंत्री अजित पवार यानी सादर केल्‍याची टिका माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्‍प फसवा असल्‍याची टिका आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्‍यातील जनतेला या अर्थसंकल्‍पाकडून मोठया अपेक्षा असताना अर्थमंत्र्यांनी मात्र जनतेच्‍या तोंडला पाने पुसली आहे. विकासाबाबत प्रादेशिक समतोलाचा अभाव प्रामुख्‍याने दिसुन येतो. नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना ५० हजार रू. प्रोत्‍साहनपर देण्‍याबाबतचे आश्‍वासन गेल्‍या अर्थसंकल्‍पात देण्‍यात आले होते मात्र त्‍याची अंमलबजावणी झालेली नाही. पुन्‍हा याच विषयाला स्‍पर्श करण्‍यात आला आहे. केवळ घोषणांचा पाऊस अर्थमंत्र्यांनी पाडला असून बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना देण्‍यात आलेली नाही.विकासाचा कोणताही ठोस संकल्‍प नसलेला, अर्थहीन, दिशाहीन व राज्‍याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्‍प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्‍याची टिका माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment