चंद्रपुर :-स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे करियर कौन्सिलिंग अॅण्ड एम्प्लॉयमेंट गायडन्स सेल द्वारा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ एन जी उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात भद्रावती नगर परिषद चे मुख्याधिकारी मा. सूर्यकांत पिदूरकर हे प्रमुख व्याख्याता म्हणुन उपस्थित होते.Continuity in study and hard work is the key to success Hon. Suryakant Pidurkar विद्यार्थ्यांनी आपले पदवी शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेचीही तयारी करावी. त्यासाठी भरपूर वाचन करावे.सातत्याने, चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते असे मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी बोलताना केले. यावेळी श्री पिदूरकर यांनी विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोग द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो, त्याचा आपण कसा अभ्यास करावा हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.हा संपूर्ण अभ्यासक्रम प्रशासकीय अधिकारी म्हणुन समाजात काम करताना, लोकांचे प्रश्न सोडविताना अतिशय उपयुक्त ठरतो असेही ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारून शंका समाधान देखील करून घेतले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य उमाटे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून त्यावर मार्गक्रमण करण्याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. मोहित सावे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ ज्योती राखूंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ सुधीर आष्टुणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
0 comments:
Post a Comment