Ads

लोकाभिमुख सेवा देणारा अर्थसंकल्प : खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाकरिता भरीव तरतुद असलेला लोकाभिमुख अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. असल्याची प्रतिकिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.
महिला भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्याकरिता १७१ क्षेत्रामध्ये जंगल सफारी सुरू करण्यात येणार असून चंद्रपूर येथे वन्यजीव बचाव केंद्र उभारणार आहे. मी व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन कचराळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता २५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याकरीत पीक कर्जात भरीव वाढ करण्यात आली आहे. सिंचन क्षेत्रात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. युवकांना क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरिता क्रीडा विभागाला ३८५ कोटी रुपये देण्यात आले आहे. माझी वसुंधरा या योजनेकरिता १०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाकाळात बेरोजगारी वाढल्यामुळे ३ लाख ३० हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व शेतकरी, भूमिपुत्र, सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांचा लाभ, लोकाभिमुख सेवा देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment