🚨 चंद्रपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! २० तासांत ३ वर्षीय चिमुकल्याची सुटका; अपहरण करून ३.५ लाखांत विक्री करणारी टोळी जेरबंद
चंद्रपूर, दि. ०१ मार्च २०२६ – बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या २० तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी तेलंगणातील महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून दोन पुरुष आरोपी फरार आहेत. crime Chandrapur Police's impressive performance! 3-year-old child rescued in 20 hours; Gang arrested for kidnapping and selling for Rs 3.5 lakh
२७ वर्षीय महिलेने पोलीस ठाणे बल्लारपूर येथे दिलेल्या तक्रारीनुसार, ती व तिचे पती रेल्वे स्टेशन परिसरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करतात. २७ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबासह खुल्या पटांगणात झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. याप्रकरणी गुन्हा क्र. ३२३/२०२६ कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलीस ठाण्याची सात पथके तात्काळ रवाना करण्यात आली. १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे आरोपींचा माग काढण्यात यश आले.
तपासादरम्यान आरोपी ऐलक्का रायसिंग बुद्दे (६०), राणी विनोदकुमार पसनोटी (३०), संगिता व्यंकटेश पानंगणती (४०) या मंचेरियल, तेलंगणा येथील महिलांनी दोन पुरुष साथीदारांसह मुलाचे अपहरण करून चारचाकी वाहनाने तेलंगणात नेल्याचे उघड झाले. पुढे सातक्का चंद्रया करेरे (५०) व लावण्या कुमारस्वामी कोणा (३४) यांना तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांत मुलाची विक्री करण्यात आली होती.
चंद्रपूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचेरियल पोलिसांच्या मदतीने सर्व पाच महिलांना अटक केली असून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. फरार दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. गौरव कायंदेपाटील, परीविक्षाधिन सहा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा उपविभाग चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात
श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बल्लारपुर यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, बलराम झाडोकार, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि. अभिषेक जंगमवार, पोउपनि. विक्की लोखंडे पोउपनि. सुनिल गौरकार, सफौ. णनराज करकाडे, पोहवा. संतोष दांडेकर, पोहवा. मोहन निशाद, पोहवा. प्रविण निकोडे, पोहवा. किशोर वैरागडे, पोहवा./अजय बागेसर, पोहवा./इम्रान खान, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. गजानन मडावी, पोशि/हिरालाल गुप्ता, पो.अं. शेखर माथनकर, पोशि/शंशाक बदामवार, पो.अं. किशोर वाकाटे, पो.अं. वैभव गाडगे, पो.अं. नरेंद्र वाकडे, महिला पो. अंमलदार अनिता नायडु, पोअं. रिषभ बारसिंगे, मिलीद टेकाम व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पो.अं. अनिमेश भोंगळे यांनी केली असुन तेलंगणा राज्य मंचेरियल पोलीस दलातील मा. श्री. ए. भास्कर, पोलीस उपायुक्त, मा. श्री. आर.प्रकाश, सहा. पोलीस उपायुक्त, श्री. एस. प्रमोद राव, पोलीस निरीक्षक, पोहवा. ई उपेंद्र, पोहवा. जे दशरथ, पोशी. एम लक्ष्मण, पोशी. आर थिरुपती, पोशी. महेश बेबी, पोशी. एम लक्ष्मण यांनी आरोपी ताब्यात घेण्यासाठी चंद्रपुर पोलीस पथकाला मोलाची सहकार्य केली आहे.
📢 पोलिसांचे आवाहन
चंद्रपूर पोलीस दलातर्फे “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत हरवलेली व पळवून नेलेली मुले शोधण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ डायल ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.
चंद्रपूर पोलिसांच्या या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे एका कुटुंबाला आपला चिमुकला पुन्हा मिळाला असून जिल्ह्यातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment