Ads

बालका सोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला जमावाने झोडपले

सिंदेवाही प्रतीनिधी:-आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जमावाने झोडपून The mob beat up the culprit who was committing mischief with the child पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रात्री साडेआठ सिंदेवाही बसस्थानक नजीक हाटेल मनमंदीर मध्ये घडली.
सविस्तर वृत्त असे की काल (दि. 28) महात्मा फुले चौकातील तिसऱ्या वर्गात शिकणारा मनीष आणि स्वागत हे दोघेही घराजवळ खेळत होते. यावेळी थामदेव मेंढूळकर वय 41 रा. नागपूर हा व्यक्ती त्या मुलांना मी तुमच्या घरचा पाहुणा आहे चला तुम्हाला चप्पल व घड्याळ घेऊन देतो अस सांगून सोबत घेऊन गेला. चप्पल च्या दुकानात त्यांना सॅंडल घेऊन दिली व बस स्टँड च्या बाजूला असलेल्या मनमंदिर हॉटेलमध्ये रूम नंबर 102 मध्ये निघून गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या बालकांना कपडे काढायला लावले. त्यांच्यासोबत दुष्कृत्य  Misdemeanor करायला सुरुवात केली. स्वागत नावाच्या मुलाने मला संडास लागली असे सांगून नराधमाच्या तावडीतून सुटका केली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून आईवडिलांची शोधा शोध सुरू झाली. बस स्टँड जवळ मुलांची शोध घेत असताना घाबरलेल्या अवस्थेत स्वागत येताना दिसला. स्वागतला विचारणा केली असता त्याने मनीष हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. मनीषा चे वडील किशोर देविदास आदे वय 37 यांनी त्या मुलाला घेऊन रूम नंबर 102 च्या दारावर थाप दिली. परंतु दरवाजा उघडल्या जात नव्हता. हॉटेल मालकाला सांगण्यासाठी किशोर खाली उतरत असताना गावातील मिथुन मेश्राम, अमन भाई व इतर वर येताना दिसले. सर्वांनी पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा उघडला गेला. मनीष रडत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या वडिलांना व इतरांना आप बीती सांगितले. संतापलेल्या जमावाने आरोपीला चांगलेच झोडपून काढले व पोलिसांच्या स्वाधीन handover to policeकेले. आरोपीचे वीस वर्षांपूर्वी सलून चे दुकान सिंदेवाही असल्याचे समजते. आरोपीविरुद्ध भादवि कलम 363, 377, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण अधिनियम कलम सहा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment