Ads

पेसा क्षेत्रात येणाऱ्या लक्कडकोट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शर्मा व प्रशासक हेडाऊ यांचा देशी दारू भट्टी ला परवानगी देण्याचा कट

राजुरा/ प्रतिनिधी:- राजुरा तालुक्यातील लक्कडकोट ग्रामपंचयत ची कमिटी बरखास्त झाली असून प्रशासक adminstrator नेमण्यात आलेला आहे.
याचाच फायदा घेत ग्रामसेवक शर्मा व प्रशासक हेडाऊ यांनी देशी बार Country barला परवानगी देण्यासाठी ग्रामसभा gram sabh बोलाविली असून याचे तीव्र पडसाद गावात उमटत असून लक्ककडकोट ग्रामपंचायत पेसा क्षेत्रात येत असून या ग्रामपंचायत च्या हद्दीतील सर्व गावे ही आदिवासी गावे असून दारिद्र्याचे, शिक्षित पणाचे प्रमाण जास्त असून प्रामुख्याने गोंड, कोलाम, पारधी, परधान ही जमात वास्तव्यास असून देशी बार किंवा देशी भट्टी country liquor shop ला परवानगी दिल्यास अनेक महिलांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार असून याचा शाळकरी मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याने दिनांक 29/3/2022 ला घेण्यात येणाऱ्या देशी बार चा विषय रद्द करण्यात यावा अशी मागणी महिपाल मडावी यांनी निवेदनातून केली आहे.
प्रशासक असताना गावाच्या हिताचे विषय ग्रामसभेत न घेता केवळ स्वार्थापोटी महिलांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे विषय शासनाचे अधिकारी घेत असल्याने राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचे मत महिपाल मडावी यांनी व्यक्त केले असून यात बड्या राजकारण्यांचा हात असून लाखो रुपयाची उलाढाल झाली असल्याची शंका महिपाल मडावी यांनी व्यक्त केली आहे. मुळात लक्कडकोट गावातील नागरिक अशिक्षित असल्याने त्यांना भविष्यातील तोटे माहीत नाही नेमका याचा फायदा घेत ग्रामसभेत देशी दारू बार/ भट्टी ला परवानगी देण्याचा विषय पारित करण्याचा डाव असून असे केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिपाल मडावी यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment