राजुरा येथे गस्तीदरम्यान कारवाई; चारचाकीतून धारदार तलवार जप्त, युवकावर गुन्हा दाखल
राजुरा : राजुरा पोलिसांनी गुडमॉर्निंग गस्ती दरम्यान संशयित चारचाकी वाहनाची झडती घेतली असता धारदार लोखंडी पत्त्याची तलवार आढळून आली. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन राजुरा येथे अप क्रमांक 293/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 (1)(C) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पीएसआय दिपक ठाकरे यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी रितेश यशवंत सोनवणे (वय 21 वर्ष, रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर) याच्याकडून पंचायत समिती चौक, राजुरा येथे 25 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास संशयितरीत्या मिळालेल्या चारचाकी वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता एक धारदार लोखंडी तलवार अवैधरित्या मिळून आली. आरोपीचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस निरीक्षक सुमित परतेकी व प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग राजुराचे प्रमुख पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा विकी निर्वाण, पुंडलिक परचाके व पोअं. जितेंद्र हेपट यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दिपक ठाकरे करीत आहेत.
0 comments:
Post a Comment