​भद्रावती पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; ६ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

भद्रावती प्रतिनिधी /जावेद शेख :  भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे विजासन रोड, रेल्वे गेट परिसरात नाकाबंदी करून अवैध रेतीची चोरी व वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ₹ ६,३६,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
Bhadravati police take strict action against illegal sand transportation; Goods worth Rs. 6 lakh 36 thousand seized!
​
​दिनांक २३/१०/२०२६ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमली पदार्थ/अवैध धंदे विरोधी पेट्रोलिंग पथक विजासन रोड परिसरात गस्त घालत असताना, चारगाव जवळील वर्धा नदीच्या पात्रातून अवैधपणे रेतीची चोरी करून ती ट्रॅक्टरमध्ये भरून भद्रावतीकडे आणली जात असल्याची गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली.  
​प्राप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे गेट विजासन रोडवर पंचांसमक्ष नाकाबंदी केली. सायंकाळी १९:४५ वाजताच्या सुमारास संशयास्पद लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना दिसल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पहाणी केली असता त्यात अवैध रेती भरलेली आढळून आली.  
​चालकाकडे रेती उत्खनन व वाहतुकीबाबत कोणताही शासकीय परवाना (रॉयल्टी) नसल्याने ट्रॅक्टर चालक-मालकास ताब्यात घेण्यात आले. 
 
ट्रॅक्टर मालक.
​नाव: अमोल नामदेव पोटे (वय ३८ वर्षे)  
​राहाणार: सूर्य मंदिर वार्ड, भद्रावती, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर  

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
​महिंद्रा YUVO TECH-575 DI ट्रॅक्टर (लाल रंग, विना क्रमांकाचा) – कि. अं. ₹ ५,५०,०००/-  
​चेसीस क्र.: MBNPFALBERNA05387  
​इंजिन क्र.: NRA2GJE0057  
​राम कंपनीची ट्रॉली (लाल रंग, विना क्रमांकाची) – कि. अं. ₹ ८०,०००/-  
​अवैध रेती (अंदाजे १०० फूट) – कि. अं. ₹ ६,०००/-  एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ६,३६,०००/- (सहा लाख छत्तीस हजार रुपये)  

​सदर प्रकरणी फिर्यादी पो.हवा. गोपाल मधुकर आतकुलवार (ब.नं. २५७९) यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल नामदेव पोटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ अन्वये पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  
​
​सदर कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभाग वरोरा) मा. प्रभारी अधिकारी परी पो उप अधिक्षक श्री. सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली (पो.स्टे. भद्रावती), पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. देवानंद डुकरे, पो.हवा. प्रशांत शेंदरे, पो.हवा. अनुप आस्टुनकर,पो.अ. संतोष राठोड, पो.अ. खुशाल कावळे,मपोअ. मोनाली गारघाटे  मपोअ. पुजा पंधरे व मपोअ. रागिनी रायपुरे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment