जिवती, चंद्रपूर : ड्राय डेच्या दिवशी देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याने उपविभाग राजुरा–गडचांदूर पथकाने जिवती येथे धडक कारवाई केली. या कारवाईत १३ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३०० बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Liquor sales continue even on Dry Day!मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा जिवती येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची बाब समोर आली. त्यानुसार कारवाई करत पथकाने आरोपी चंद्रकांत शेषराव फुकटवाड (वय २५ वर्षे, रा. धोंडाअर्जुनी, ता. जिवती, जि. चंद्रपूर) याच्याकडून ९० मिली क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या एकूण ३०० बाटल्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत १३ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी जिवती पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १८८/२३, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई पथक : उपविभाग राजुरा–गडचांदूर टीम.
ड्राय डेच्या दिवशीही अवैध दारूविक्री सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
0 comments:
Post a Comment