Ads

वर्धा नदीच्या पुलावर ट्रक आणि मोटारसायकलची धडक; दोन मजूर गंभीर जखमी

Truck and motorcycle collision on Wardha river bridge; Two laborers seriously injured
घुग्घुस :- वेकोलि एमएच 34 बीजे 8012 या खासगी कंपनीत काम करणारे गोलछा या खासगी कंपनीचे कर्मचारी मंगळवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंगोली येथील वर्धा नदीच्या पुलावर नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून कामावर जात होते. . वर्धा नदीच्या पुलावर समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या एमएच 34 बीझेड 4023 क्रमांकाच्या 18 चाकी ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मोटरसायकलचा चक्कानाचूर झाली
या अपघातात भद्रावती येथील रहिवासी तरुणकुमार दयाल कुशवा आणि जितेंद्र कुमार झा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे पाहून ट्रक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

दोन्ही मजूर वेकोलि वणी परिसरातील पैनगंगा खाणीतील माती उत्खनन कंपनीत काम करतात, असे सांगण्यात येत आहे. घुग्घुस पोलीस अधिक तपास करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment