Ads

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीची गळफास घेत आत्महत्या


वरोरा :- वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील आराध्य लॉन मागच्या बाजूस असलेल्या एका स्थानिक विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या suicideकेल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना दिनांक 10 मार्च 2022 ला सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास घडली.

हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या अनन्या चंद्रशेखर चिमुरकर वय 18 वर्ष हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अनन्या हि नुकतेच बारावी बोर्डाच्या परीक्षेचे दोन पेपर दिले, उर्वरित चार पेपर बाकी होते.

घटनेच्या दिवशी भाऊ ड्युटीवर गेला होता व तिची आई घरी आपल्या कामात व्यस्त असतांना तिने गळफास घेतला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. कुठल्या कारणांमुळे गळफास घेतला हे अद्याप कळू शकले नसून पुढील तपास वरोरा पोलिस करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment