Ads

कोळसा सॅम्पलरचे कामबंद आंदोलनाला सुरुवात.

Coal Sampler's strike begins
घुग्घुस :-कोळशाचे उत्पादन करणारे कोल इंडिया coal india आणि विद्युत निर्मिती करिता कोळशा खरेदी करणारे महाजेनको mahgencoया कंपन्यांनी नियमानुसार कोळशाचे गुणवत्ता तपासणीचे कंत्राट संयुक्तपणे सिम्फर या कंपनीला दिले आहेत.

आणि सिन्फर या कंपनीने कोटनका इंस्पेकॅशन प्रा. लि या कंपनीला कंत्राट दिले.
कोटेनका ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सब एरिया कार्यालय परिसरातील कार्यालयातून घुग्घुस रेल्वे सायडिंग मधून कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करीत
आहे.

याठिकाणी जवळपास चौवीस कामगारांचा शोषण केल्या जात आहे.
त्यांना वेकोलीच्या हाय पॉवर कमेटीने निर्धारित केलेले वेतन दिल्या जात नाही.
साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळत नाही, यासोबतच धूळ भत्ता,मेडिकल सह अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी आज दिनांक 11 मार्च सकाळी 08 वाजताच्या पाळी पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सदर आंदोलन काँग्रेस शहराध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली शुरू करण्यात आले आहे.

कोळशाची चाचणी तपासणी बंद पडल्याने वेकोली गुणवत्ता तपासणी न करता कोळशाच्या नावावर दगळ - धोंडे माती मिक्स in the name of coal - stone soil mix करून महजेनकोला पाठविल्या जात असल्याने वीज केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागणार आहे.

या गंभीर प्रकाराकडे वेकोली व महाजेंनकोने तातळीने लक्ष देऊन
सिम्फर या कंपनीस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देऊन कोटनका या कंपनीस कामगारांच्या वेतनात वाढ करण्यास बाध्य करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आज कामबंद आंदोलनात सचिन कोंडावार, प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालापेल्ली,अशोक सोनटक्के,विशाल जंगम,रवी भगत,प्रमोद मांढरे,बाबा जीवन,लीलाधर आत्राम,सुशांत वाघमारे,कुमार अंबाला,योगेश आरपवल्ली,सुधाकर जुंघरे,राजू कांबळे,राजू पाटील,प्रशांत तोंगे,महादेव मांढरे,विजय नागपुरे,सचिन मांढरे,अमित कामतवार, यांनी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment