घूग्घुस :- पंजाब punjab मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा १० मार्च रोजी ११७ मधून ९२ सिटांवर दणदणीत विजय मिळविला असून संपूर्ण देशामध्ये खुशीची लहर पसरलेली आहे. भाजप आणि काँग्रेस ने मागील १५ वर्षांपासून कोणतेही लोकहिताचे कार्य केले नाही आणि झाडू हे घराची लक्ष्मी असते म्हणून येत्या निवडणुकी मध्ये झाडू लाच मत द्यायचे आहे अशे महिला संघटनमंत्री श्री.पुनम वर्मा यांनी संबोधताना म्हटले.११ मार्च २०२२ रोजी आम आदमी पार्टी घूग्घुस AAP Ghugus द्वारा गांधी चौक घूग्घुस मध्ये विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला. घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी येत्या घूग्घुस नगरपरिषद निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने मैदानात उतरू व जिंकून येऊ आणि सर्व सामान्यांची सरकार बसवू असा विश्वास यावेळी दाखविला. "बदली है दिल्ली बदला हैं पंजाब..अब बदलेगा घूग्घुस" असा नारा जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,चंद्रपूर शहर उपाध्यक्ष साकिंद्र सागोरे, घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, महिला शहर अध्यक्ष उमा तोक्कलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, विजया उपलेट्टी, नसीम शेख, धम्मदिना नायडू, नईमा शेख, संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, अनुप धनविजय, कुलदीप पाटील, प्रशांत सेनानी, रवी शांतलावार, अभिषेक तालापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे, सागर बिऱ्हाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.....
0 comments:
Post a Comment