Ads

दुर्गापुर, डब्ल्यु, सि. एल कॉलनी व नेरी परिसरातील झाडा झुडपांची तात्काळ सफाई करा, अन्यथा आंदोलन :- नितिन भटारकर.



चंद्रपूर:- डब्ल्यू. सी. एल. कॉलनी, दुर्गापूर वस्ती मागील परिसर व नेरी कोंडी या परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघ, बिबट, अस्वल या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून मागील महिन्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात सतत दोन दिवस दोन नागरिकांचे जीव गेले.

त्यानंतर वनविभागाने सदर परिसराची पाहणी केल्यानंतर या परिसरात वाढलेले झाडी झुडपे हे या वन्यप्राण्यांसाठी सोयीचे झाले असून येथे वाढलेला कचरा तात्काळ साफ करण्याचे निर्देश वनविभागाने वे को.लि. व्यवस्थापनाला दिले होते.

मागील महिन्यात वन विभागाने सुचविलेल्या काही ठिकाणी वे.को.लि. प्रशासनाने व्हीलडोजर व जेसीबी च्या साह्याने साफसफाई केली. मात्र मागील काही दिवसांपासून वे.को.लि. द्वारा या परिसराची साफसफाई करणे बंद केले आहे.

ज्या ठिकाणी वनविभागाने वे.को.ली. ला सफाई करण्याचे निर्देश दिले होते व या ठिकाणीं बिबट्या मोठ्या प्रमाणत येऊ शकते अशी शंका उपस्थित केली होती त्याचं ठिकाणी दोन दिवसापूर्वी बिबट्या अनेकदा आला असून अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिले होते.

म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात दुर्गापूर सब एरिया विभागाचे उपव्यवस्थापक मा. श्री. अरुणजी लाखे यांची प्रत्यक्ष भेट घेत दुर्गापुर डब्लू. सी. एल. कॉलनी, वॉर्ड नंबर २ व वॉर्ड नंबर ३ स्मशानभुमी च्या लगत असलेल्या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपांची तसेच नेरी गावातील स्मशानभूमीच्या मागील परिसराची तात्काळ सफाई करणे सुरू करावे या मागणीकरिता लेखी निवेदन दिले.

यावेळी ग्रामपंचायत दुर्गापुरच्या सरपंचा सौ. पूजाताई मानकर, माजी सरपंच मा. अमोल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य निखिलजी हस्ते, ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षाताई रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिनजी मांदाडे, मा. महेशभाऊ जुमनाके हे उपस्थित होते.

येत्या तीन दिवसात वे.को.लि. ने झाडं-झुडपांच्या सफाईला सुरुवात न केल्यास वे.को.ली. दुर्गापूर च्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment