भद्रावती (प्रतिनिधी – जावेद शेख)
भद्रावती शहरातील विंजासन परिसरात असलेल्या देवालय सोसायटीत भरदिवसा घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाख रुपये रोख व दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना दिनांक १८ रोजी घडली. crime newsBurglary in broad daylight at Devalaya Society in Vinjasan area
मूळ बेलोरा येथील रहिवासी तनुज पंडीले हे देवालय सोसायटीतील कावेरी बिल्डिंगमध्ये भाड्याने राहतात. घटनेच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास ते कुटुंबासह लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर घरातील कपाट उघडे असून रोख रक्कम व सोन्याचे ब्रेसलेट चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पंडीले यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे.
सदर प्रकरणाचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment