भद्रावती तालुका प्रतिनिधी:- भद्रावती येथे 25 वर्ष वयोगटातील एका चंद्रपूर अनोळखी युवतीचा शिरच्छेद The beheading of an unknown young ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात बेवारस फेकून दिल्याची खळबळजणक घटना उघडकीस आली आहे. आज सोमवारी (4 एप्रिल 22) ला सकाळी अकराच्या सुमारास धडावेगळा असलेला मृतदेह आढळून आला आहे. अद्यापर्यंत सदर मृतदेहाची ओळख पटलेली नसून मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंडका शोधून काढण्यासाठी स्थानिक आणि चंद्रपूर पोलिसांची चमू भद्रावतीत घटनास्थळी दाखल झाली आहे. शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
चंद्रपूर पासून तीस किमी अंतरावर भद्रावती तालक्याचे ठिकाण आहे. येथील ढोरवासा ते पिपरी मार्गावरील सरकारी आयटीआय जवळील शेतशिवारात अंदाजे 25 वर्षवयोगटातील युवतीचा मृतदेह नग्नावस्थेत बेवारस फेकून दिला असल्याचा निनावी फोन आज सकाळी अकरावाजताचे सुमारास भद्रावती पोलिसांना आला. सदर निनावी फोनद्वारे आलेल्या माहितीने भद्रावती पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. लगेच पोलिसांचा ताफा सरकारी आयटीआय लगतच्या शेतशिवारात दाखल झाला.
त्या ठिकाणी पोलिसांना शिरच्छेद करून मृतदेह बेवारस फेकून दिल्याचे दिसून आले. मृतदेह नग्नावस्थेत आणि मुंडका नसलेला होता. फक्त धड तेवढाच होता. सदर घटनेची माहिती भद्रावती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस अधिक्षकांना या घटनेची माहिती देण्यात आली. अप्प्र पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भद्रावती येथे घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून घटनास्थळ परिसरातील शेतशिवारात मुंडका शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. दुपार पर्यंत या घटनेत धडावेगळा असलेला शिर शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने सदर युवतीसोबत अत्याचार करून क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याजात आहे.
0 comments:
Post a Comment