Ads

बाबूपेठ उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाबूपेठ वासियांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार

चंद्रपुर :- बाबुपेठ येथिल रेल्वे रुळावर उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. मात्र निधी अभावी सदर पुलाच्या बांधकामाची गती मंदावली होती. त्यामुळे या पुल बांधकामाच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. या संदर्भात त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सविस्तर चर्चा करून नागरिकांची होत असलेली अडचण लक्षात आणून दिली होती. त्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांनी सदर पुलाच्या कामासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला.
 सदर निधी मंजूर होताच बाबूपेठ वासियांमध्ये उत्साह आहे. दरम्यान येथील नागरिकांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत आ. जोरगेवार यांचे आभार मानले आहे.

 यावेळी याच वर्षी सदर उड्डाणपुलावरून वाहतूक सूरू होईल या दिशेने माझे प्रयत्न सुरू असून मनपाने यासाठी त्यांच्याकडे असलेले 5 कोटी रुपये तात्काळ वळते करावे असे निर्देश दिले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ वासियांना सांगितले आहे. या प्रसंगी बाबूपेठ येथील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment