चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज 25 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
हत्या ची घटना उघडकीस होताच चंद्रपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अष्ठभुजा वार्डात 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. Murder with a sharp weapon
रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला, प्रकरणाचे गांभीर्य बघता जिल्हा पोलीसअधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर प्रकरणाचा तपास सोपविला. Dharmaveer murder Case
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात हत्या 24 मे च्या रात्री 10.30 ते 11 वाजेदरम्यान झाला असल्याची माहिती पुढे आली. Chandrapur police धर्मवीर चे अष्टभुजा वार्डात एकाशी वाद असल्याची माहिती होती, स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत अधिक माहिती गोळा केल्यावर यामध्ये चेतन उर्फ चेतन सोनवणे यांच्या 2 साथीदारांनी रात्रीच्या सुमारास धर्मवीर सोबत वाद घालत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
या हल्ल्यात धर्मवीर चा जागीच मृत्यू झाला, नेमका वाद काय होता याबाबत माहिती मिळाली नाही, मुख्य आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती आहे, मृतक धर्मवीर यांचेवर 2 हत्येचे गुन्हे दाखल होते.मुख्य आरोपी चेतन सोनवणे याला मोरवा विमानतळ परिसरातून ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे.
हत्या प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून 1 आरोपी सध्या फरार आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्याची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, संजय आतकुलवार, दीपक डोंगरे, प्रांजल झिलपे, गणेश भोयर, चंद्रशेखर आसुटकर यांनी पार पाडली.
0 comments:
Post a Comment