ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :- तालुक्यातील देलनवाडी येथील बँक ऑफ बडोदा बँकेच्या एटीएम खोलीला शनिवार, 14 मे रोजी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने एकच तारांबळ उडाली.
ब्रम्हपुरी शहरात जवळपास सर्वच बँक व एटीएम यंत्र आहेत. बँक ऑफ बडोदाचे एटीएम यंत्र बँकेला लागून आहे.
शनिवारी पहाटे काही नागरिक फिरावयास जात असताना एटीएम खोलीमधूनन धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. बँक व्यवस्थापकाला मुख्य कार्यालयाकडून संदेश आला असता नागरिक व बँकेचे कर्मचारी यांनी धाव घेऊन आग विझविण्याकरिता प्रयत्न केले. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने बँके समोर असलेल्या साई पेट्रोल पंपवरून पाण्याचा पाईप धर्मा भरडकर यांनी लांबवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. लगेच नगरपरिषदची अग्निशमन वाहन पोहचल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत एटीएम जळून खाक झाले असून, आगीचे धूर आजूबाजूला पसरल्याने कोंदट वातावरण निर्माण झाले होते. आग लवकर आटोक्यात आल्याने इतरत्र हानी टळली.
बँक कर्मचारी अमोल राऊत व त्यांचे सहकारी यांनी आग विझविण्यात बरीच मदत केली. यावेळी पोलिस निरीक्षक रोशन यादव आपल्या ताफ्यासह उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment