चंद्रपूर :- दि. 20/05/2022 ला फिर्यादी नामे संतोष भास्कर गर्गेलवार, राहणार विठठल मंदिर वार्ड यांनी फिर्याद दिली की दि. 20/05/22 पहाटे 02/00 वा सुमारास बाबुपेठ स्मशानभूमी, बायपास रोड लगत चंद्रपुर येथे असलेल्या महानगर पालीकेच्या गोडाउनचा ताला तुटलेला आहे व आत ठेवलेल्या एच.पि. कंपनीच्या सिलेन्डर पैकी 4 नग सिलेन्डर किंमत अंदाजे 10,000/ रुचे कोनीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे cylinder theft अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व पो.स्टे. रामनगर येथील प्रथम खबरी 517/22 वरून पोर्स्ट चंद्रपुर शहर येथे अप.क. 273/22 कलम 461,380 भादवि गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला. (City police station)
सदर गुन्हयाचे पुढील तपासात मुखवीर नेमण गुन्हया सबंधाने मुखवीर च्या माहीती वरून विशाल प्रकाश डोंगरे वय 36 वर्ष, रवि उर्फ चक्या रमेश पेन्डारकर वय 28 वर्षे व अमीत इश्वर दुर्गे वय 30 वर्षे तिन्ही रा भिवापुर वार्ड, चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी महानगर पालीकेच्या गोडाउनचा ताला तोडुन आत ठेवलेले एच.पि. कंपनीचे सिलेन्डर पैकी 4 नग सिलेन्डर कि, अंदाजे 10,000/ रू चे चोरल्याची कबुली दिली.
तेव्हा एच.पि. कंपनीच्या 4 नग सिलेन्डर कि अंदाजे 10,000/ रू व आरोपनी गुन्हयात वापरलेली एक मोटर सायकल कि 15,000 रू ची असा एकुण 25,000/-रु चा माल आरोपींचे ताब्यातुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील स.पो.नी. जयप्रकाश निर्मल, पो.हवा. महेंद्र बेसरकर, शरिफ शेख, विलास निकोडे, नापोको जयंता चुनारकर, सचीन बोरकर, चेतन गज्जलवार, पोअ. रूपेश रनदिवे ईमान खान यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment