सावली प्रतिनिधी:- सावली तालुक्यातील व्याहाड बुज हे गाव डोंगर, पहाडानी व्यापलेलं गाव आहे.या गावामध्ये डोंगरी चा भाग असल्याने तालुक्याच्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या बांधकामाकरिता, सडक, रस्ते, बनवण्याकरिता ठेकेदार मजूर वर्गांना कामाला लावून आपली ठेकेदारी करीत आहेत.

परंतु, काम करीत असताना एखादा मजूर वर्ग दगावला तर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. ही बाब लक्षात आलेली असून याकडे महसूल विभागाचेकर्मचारी कानाडोळा करून व ठेकेदाराच्या संगनमताने या डोंगरी वरील मुरूम व गिट्टी खोदकामाचे काम सुरू असून याकडे महसूल विभागाचे कर्मचारी लक्ष देत नाही. असे लक्षात आले आहे. एक-दोन महिने अगोदरच गावातील एक मजुर गिट्टी खोदकामाचे काम करताना खदानीच्या उंच भागावरून खोदकाम करीत असताना खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. पण अतिशय गंभीररित्या जखमी झाल्याने. त्याची प्रकृती गंभीर झालेली असताना त्याला नागपूर येथे हलवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. पण त्याची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने व कुटुंबामध्ये वृद्ध पत्नी असल्याने त्यांनी नागपूरला नेण्याचा खर्च इतर आर्थिक खर्च झेपत नसल्याने त्यांनी सरळ पेशंटला आपल्या घरी आणलं, पंधरा व एक महिन्याच्या अवधीमधे आज दि. 16/5/ 2022 ला मृत्यू झाला. यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी गिट्टी व खोदकाम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
ज्या मजुराच्या मजुरीवर ठेकेदार मोठे झाले. मजुराच्या मजुरीवर् ररस्ते बनले, सडका बनले, पण त्याला एकही आर्थिक मदत दिलेली नाही.
अवैधरित्या खोदकामकरून, गिट्टीखोदकामकरून, मुरूमखोदकाम करण्यात आले अहे.याला जबाबदार महसूल विभागाचे कर्मचारी व ठेकेदार आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे. अन्यथा अजून एखादी मजुराचा मृत्यू झाल्यास याला कारणीभूत महसुल् विभागाचे कर्मचारी राहतील. असा इशारा , ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांनी दिला आहे
0 comments:
Post a Comment