बुधवार दिनांक 25/5/ 22 ला रात्री दहा वाजता च्या सुमारास पळसगाव ला जातो असे पत्नीला सांगून घरून निघून गेले . भेंडाळा रोडवरील अंबादास बनसोड यांच्या शेतात विहिरीच्या बाजूला आंब्याचे झाड आहेत. मृतक तीर्थ नागदेवते विहिरीत पडले असता त्यांचे सोबत आंबे असलेली चूंगडी होती. शेतातील विहिरीत रात्री अंधारात आंब्याची चुंगडी घेऊनच विहिरीत पडले असल्याचे तर्क लावल्या जात आहे. सदर घटनेचा तपास पोलिस स्टेशन चे वतीने सहाय्यक फौजदार रमेश ढोके पुढील तपास कार्यवाही करीत आहे.
आंबे तोडताना विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
सिंदेवाही:- शहरापासून जवळच असलेल्या खातगाव येथील रहवासी तीर्थ नागदेवते यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे. शेतातील विहिरीत आंब्याची चुंगडी घेऊन विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. शहरापासून सात किलोमीटर अंतरावर खातगाव - भेंडाळा गाव आहे. भेंडाळा रोडवरील प्रकाश अंबादास बनसोड यांच्या शेतातील विहिरी मध्ये मृतक तीर्थ जयराम नागदेवते रा.खातगाव वय 45 वर्ष यांचा मृतदेह आढळला.
0 comments:
Post a Comment