भद्रावति तालुका प्रतिनिधि:- दिनांक 24/05/2022 रोजी, स्थळ मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चंदनखेडा येथे तालुका कृषी अधिकारी भद्रावती आयोजित कापूस सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साकळी विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत खरीप हंगाम
पूर्व नियोजन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष स्थानी श्री नयनभाऊ जांभुळे, सरपंच ग्राम पंचायत चंदनखेडा यांनी उपस्थिती दिली. कार्यशाळेस प्रमुख प्रमुख उपस्थिती कृषी उपसंचालक, जि अ कृ अ कार्या. चंद्रपूर श्री आर जे मनोहरे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व खरीप हंगामामध्ये राबविण्यात येत असलेल्या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी भद्रावती कु मोहिनी जाधव यांनी केले त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साकळी विकास कार्यक्रमा अंतर्गत निवडलेल्या गावचे नियोजन बाबत मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा श्री एम एस वरभे, यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, धान बियाण्यावर 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया मार्गदर्शन व बी बी एफ पद्धतीने सोयाबीन लागवड व वरंब्यावर कापुस पिकाची लागवड बाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. ओम ऍग्रो ऑरगॅनिक चे श्री बन्सोड यांनी माती नमुना परीक्षण किट बाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन भद्रावती श्री सुधीर हिवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदनखेडा श्री पी जी कोमटी यांनी केले. कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी भद्रावती श्री यु बी झाडे, कृषी पर्यवेक्षक सौ एम एन ताजने, चंदनखेडा ग्राम पंचायत उपसरपंच सौ भारतीताई
उरकांदे, चंदनखेडा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री संतोष खडतकर, प्रयोगशील शेतकरी श्री अनिल कुत्तरबमारे, श्री किशोर ठावरी, अनिल गायकवाड, कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment