Ads

मे.अरविंदो रियल्टी अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सामुहिक लढा उभारणार : सरपंच प्रदिप महाकुलकर

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या बरांज कोळसा खाण प्रकल्प आणि दिर्घ काळापासून थंडबस्त्यात असलेल्या निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्प यातून प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना जो न्याय मिळाला पाहीजे होता, तो मिळाला नाही. पूर्वीचा कटू अनुभव लक्षात घेता तालुक्यात नवीन प्रकल्पांची उभारणी होत असतांना शेतकरी बांधवांनी ताक सुध्दा फूंकून पिण्याची भुमिका घेण्याची वेळ आली आहे. यामुळेच आपण स्वतः पुढाकार घेऊन मे.अरविंदो रियल्टी अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी M / s Aurobindo Realty & Infrastructure Company प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सामुहिक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन अखील भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदिप महाकुलकर यांनी केले आहे.

तालुक्यातील अरविंदो रियल्टी अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी खाण प्रकल्पाच्या प्रस्तावित टाकळी जेना बेलोरा उत्तर -दक्षिण खुल्या भुमिगत खाणीच्या संदर्भात २१ जून रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी , ग्रा.पं. सरपंच, सदस्य, ग्रामस्थ , प्रशासकीय अधिकारी व कंपनीचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर अखील भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत पानवडाळाचे . सरपंच प्रदिप महाकुलकर पुढे म्हणाले की, तालुक्यातील सुमारे साडेनऊशे हेक्टर जमिनीवर मे.अरविंदो रियल्टी अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. चा खाण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्प उभारणीसाठी पानवडाळा, कान्सा ( सि. ), डोंगरगाव ( खडी ), जेना, बेलोरा, टाकळी, कढोली व किलोनी या परीसरातील जमीन संपादित करण्यात येणार आहे.
या सर्व गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व प्रकल्पबाधीत नागरिक
यांना योग्य न्याय मिळावा. अशी आपली भुमिका असल्याचे सरपंच प्रदिप महाकुलकर म्हणाले. सदर प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला प्रति एकरी साठ लाख याप्रमाणे भाव द्यावा.सदर प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेतांना वेकोलि व्यवस्थापना प्रमाणे भत्ते, वेळोवेळी लागू होणारे वेतन आयोग व सेवा शर्तीप्रमाणे नियुक्ती द्यावी. नोकरी देतांना कंत्राटी पध्दत नसावी. कंपनीमार्फत प्रकल्पबाधीत क्षेत्रात पुरेशा आरोग्य विषय सेवा देण्यात यावी. तज्ञ डॉक्टर, उपचारसामुग्रीसह दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सर्व मुलभुत सुविधा मुबलक उपलब्ध करून सोयीस्कर ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे. या ठिकाणी रस्ते, विज, पुरेसे पाणी, शैक्षणिक सुविधा, बगीचा, वाचनालय व व्यायामशाळा या सारख्या सुविधा पुरविण्यात याव्या.पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुरेशा प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे नियमित संगोपन करावे. उर्वरीत शेत शिवारात जाणे -येणे करण्यासाठी रस्त्याची सुविधा करण्यात यावी. या प्रकल्पामुळे भुजल पातळी खोल जाण्याची शक्यता असल्याने उर्वरीत शेतीला सिंचनाची पुरेशी व्यवस्था करून द्यावी. प्रदुषण नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत असावी. अश्या विविध मागण्या सदर कंपनीने उपलब्ध करून द्याव्या. असे सरपंच प्रदिप महाकुलकर यावेळी म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment