चंद्रपूर - बाबुपेठ मधील आंबेडकर चौक जूनोना चौक हे दोनिही ठिकाण अतिशय रहदारीचे असून येथे बस थांब दिलेले आहे . मागील कित्तेक वर्षा पासून बाबुपेठ जनतेचे या दोन्ही चौकात सुलभ शौचालय देन्यात यावे अशी मागणी होती . परंतू प्रशासनाचा दुर्लक्ष पणामुळे ते होवू शकले नाही. पंतप्रधान मोदीजीच्या महत्वाच्या योजणे पैकी स्वच्छ भारत मिशन हे महत्वाची योजना मानली जाते. असे असून देखील सत्ताधीश भाजपने मागील 5 वर्षात कुठेही कोणत्याही चौकात सार्वजनिक शौचालये उभारले नाही.
जुनोणा चौक मधील आटो रिक्षा चालक, व्यवसायिक यांची तक्रार आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु कूडे यांचा कडे आली त्या अनुषगाने दिनांक 16/02/2022 ला मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते परंतु त्यावर पहावी तशी कार्यवाही झालेली नसल्याने आज परत मनपा आयुक्त आणि स्वच्छ्ता अधिकारी यांच्याकडे स्वच्छता गृहाकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली जर मागण्या तात्काळ मन्य झाले नाहीत तर मोठे आंदोलन छेडू असे आप चे राजु कुडे यांनी म्हंटले आहे. या वेळेला आपचे जिला अध्यक्ष सुनील देवराव मुसळे, शहर सचिव राजु भाऊ कूडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, महिला संघटन मंत्री सुजाता बोदेले, चंदु मामिडवार, सागर बोबडे, कालिदास ओरके, , जयदेव डेवगडे, भीमराज बागेसर, अंजु रामटेक, बाबाराव खडसे सुखदेव दारुंडे, सुरेंद्र जीवने, विरू भाऊ खोब्रागडे, जयंत थूल इत्यादि उपस्थीत होते.
0 comments:
Post a Comment