Ads

चंद्रपुर शहरातील त्या खुनाच्या गुन्हयातील तिन मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

चंद्रपुर :-दि 14/06/22 रोजी रात्रो 8:30 वा ते 09:00 वा दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष येथील डायल 112 कॉल वरून माहिती प्राप्त झाली की, ज्युबली शाळेव्या मागे पडक्या ईमारतीचे वर एक चिकटपट्टीने गुडलेले पुरूष जातीचे प्रेत पडुन आहे अशा माहितीवरून पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर यानी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, पो.स्टे. रामनगर, पो.स्टे. चंद्रपूर शहर यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधीत पो. स्टेव • शाखेचे प्रमुख तात्काळ घटनास्थळी पोहचले असता ज्युबली शाळेचे मार्ग जिल्हा परीषद क्वार्टर जवळील शिक्षण भवनाचे जुण्या व पडक्या ईमारतीचे स्लॅनवर हातापायाला व मानेला चिकपट्टी गुंडलेले एक 25 ते 30 वयोगटातील पुरूषाचे प्रेत दिसून आले. प्रथम दर्शनी पाहीले असता सदर इसमाचा खुन झाल्याचे दिसून आले. त्यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांनी तात्काळ ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याचे सुचना स्थानिक गुन्हे व पोस्टे. चंद्रपूर शहर यांना केल्या. शाखा व मृतक इसमाचे
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून या बाबत पोलीस निरीक्षक, खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी त्याचे अधिनस्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक, जितेंद्र बोबडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप कापडे यांचे दोन पथक तयार करून मयत ईसमाधी ओळख व आरोपी शोध संबधाने त्यांना सुचना देण्यात आल्या. सदर पथक मयत ईसमाची ओळख व त्यास मारणाऱ्या इसमाचा शोध घेत असता मयत ईसमाबाबत गोपनिय बात्तमीदारांकडून माहिती मिळाली की, यातील मयत ईसम नामे राहूल विलास ठक वय 30वर्षे रा.हैद्राबाद बँके जवळ पेठ वार्ड, राजूरा जिचंद्रपूर हा असल्याचे निष्पन्न करण्यात यश आहे. त्यानंतर पो.स्टे चंद्रपूर शहर येथे अप क्र. 327/ 2022 कलम 302, 201 भादवी अन्वये गुन्हा नोद करण्यात आला

सदर गुन्हयातील संशईत ईसमाचा शोध घेणे चालू केले असता कोणताही ठोस व सबळ पुरावा आरोपींनी घटनास्थळावर ठेवला नव्हता आरोपीचे शोध संबंधाने सपोनि संदीप कापडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, मयत हा डॉ. चिल्लरवार यांचे दवाखान्यात गाडी चालक म्हणून काम करीत होता. तेव्हा अंदाजे 1 वर्षापुर्वी त्याचे एक स्त्री सोबत मोबाईलवर काहीतरी मेसेज केले होते त्यावरून त्यांचेत वाद झाला होता व त्या स्त्रीचे दोन मुलांनी मयत यास मारहाण केली होती. अशी गोपनिय माहिती मिळाले वरून स्थानिक गुन्हे शाखाचे पथक सदर महिलेचा शोध घेवून तिचे घरी जावून तिला व तिचे पती ला तिचे मुला बाबत विचारपूस केली असता लहान मुलगा घरी मिळून आला व मोठा मुलगा हा नाशिक येथील एम.आय.डी.सी मध्ये कामाला असून पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिली ● मिळाली. त्यावरून मुलगा नामे वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिकला आहे किंवा कसे या बाबत माहिती घेतली असता तो मागील तिन दिवसापासून नाशिक वरून चंद्रपूर ला आल्याची माहिती मिळाली त्यावरून

चंद्रपूर येथील त्याचे जवळचे मित्र कोण या बाबत माहिती घेतली असता त्याचा मित्र नामे संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30 वर्षे रा इंदीरा नगर चंद्रपूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता तो कोणतेही समाधान कारक उत्तरे देत नव्हता, नमुद इसमास विचारपूस चालू असतानाच गोपनिय खास • सुत्रांकडून विश्वसनिय माहिती मिळाली की, नामे वैभव डोंगरे हा त्याचे एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाले वरून त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले वैभव डोंगरे व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र नामे कार्तीक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक सिंदेवाही याना विचारपूस केली असता वैभव डोंगरे याने सांगीतले की, त्याचा मयत याचेशी मागील 1 वर्षा आधी झालेल्या वादावरून त्याचे साथीदार नामे 1) संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30वर्षे रा. इंदीरा नगर चंद्रपूर व 2) कार्तीक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक सिंदेवाही याचे मदतिने रात्रो दरम्यान ज्युबली शाळे 3 चे मागे जिल्हा परीषद क्वार्टर जवळील शिक्षण भवनावे जुण्या व पडक्या ईमारतीचे स्लॅपवर मयत नामे राहूल विलास तक वय 30वर्षे राहैद्राबाद बैंके जवळ मेठ वार्ड, राजूरा जि.चंद्रपूर यास नेवून • त्याला त्या ठिकाणी दारू पाजून त्याचा गळा आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जिवानीशी ठार मारले व जवळ असलेल्या चिकटपट्टीने बांधून प्रेत त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले. सदर गुन्हयात नमुद तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो

स्टे. चंद्रपूर शहर हे करीत आहे. सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर, श्री. शेखर देशमुख, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, स फौ. राजेंद्र खनके, पो. हवा स्वामी चालेकर, संजय आतकुलवार, नितीन साळवे, सुरेद्र मोहंती, ना पो कॉ सुभाष गोहोकार, चंदू नागरे, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले पो.कॉ सतिश बगमारे, कुंदन बावरी, रवि पधरे, गोपिनाथ नरोटे, प्राजल झिलपे यांनी केली असुन पुढील तपास सबंधीत पो स्टे करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment