Ads

25 वर्षांनी एकत्र आलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्नेहमिलन सोहळा

भद्रावती:- विद्यार्थ्यांचा प्रवाह हा पाण्याच्या प्रवाहातील कोंडकया सारखा असतो. इकडचे- तिकडचे विद्यार्थी शिक्षणाच्या योगायोगाने एकत्र येतात व नंतर ते विविध क्षेत्रात गेल्यामुळे एकमेकांपासून दुरावतात 25 वर्षांपूर्वी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिकत असलेले विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आनंदात स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
12th students reunited after 25 years celebrate Reunion!
यावेळी त्यांचे तत्कालीन शिक्षक असलेले व आता सेवानिवृत्त झालेले शिक्षक रेखाते यांचा या विद्यार्थ्यांनी अनुषंगाने सत्कार केला.
सण 1993 साली भद्रावती येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये विज्ञान शाखेच्या बाराव्या वर्गात सदानंद फुलझले ,चंद्रकांत खारकर, सुनील बिपटे, संजय गायकवाड, अशीष ठेगणे, निलेश जुनघरे ,सुभाष बादुरकर, आशिष उपलंचीवार, प्रवीण बंड, माया काकडे, रागिणी बोरीकर आधी विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत होते. बारावी झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात जाण्यासाठी एकमेकापासून दुरावले. मात्र मनाच्या खोल कप्प्यात आठवणी साठवून होत्या, त्यापैकी एका मित्राने मोबाईलचा काळ आल्यानंतर मिळेल त्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन व्हाट्सअप वर एक ग्रुप स्थापन केला. या ग्रुपमध्ये विद्यार्थी एकत्र आल्यानंतर त्यांचा एकमेकाशी संवाद चालू झाला .याच ग्रुपमध्ये असलेला त्यांचा एक वगँमित्र सदानंद फुलझले हा अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात अटलांटा शहरात वैज्ञानिक म्हणून आहे. योगायोगाने तो भद्रावती येथे आल्यानंतर त्याने इतर मित्रांची संपर्क साधून स्नेह मिलन सोहळा साजरा करण्याची कल्पना आखली. त्यानुसार शहरातील हॉटेल सनी पॉईंट येथे वरील मित्र एकत्र आले त्यात त्यांनी आपले गुरु रेखाते सरांनाही बोलावले व स्नेहमिलन सोहळा साजरा केला .या स्नेह मिलन सोहळ्यात मित्रांमधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकमेकांशी गुंज गोष्टी झाल्या व प्रत्येकाच्या चालू परिस्थितीवर चर्चाही रंगल्या यातील अनेक विद्यार्थी आता वैज्ञानिक, पत्रकार, आरोग्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकारण, नोकरी यात सक्रिय होऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे नाव कमाविले आहे .या स्नेह मिलन सोहळयात सर्व एकत्र आल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांचे समाधान दिसले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment