Ads

शहरातील खड्डे बुजवा आणि घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम द्या : प्रशांत ताम्हण

ब्रम्हपुरी :- नगरपरिषद ब्रम्हपुरी येथे सत्ताधारी लोकांना सत्तेत येवुन २ ते ३ वर्षांचा कालावधी झाला क्षेत्रात चांगले कामे होतील ही जनतेची अपेक्षा सपशेल फोल ठरली असून कामे तर सोडाच रस्त्यांचे तसेच नाल्यांची मोठी दुर्दशा झाली आहे.आता पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर झालेल्या गड्यात पाणी साचून असल्याने ते कोणाच्याच लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत.
व्यवस्थित गाडीसुध्दा चालविता येत नाही . रस्यात गड्डे कि गड्यात रस्ते हे समजणे कठीण आहे . त्यातच नाल्या बुजल्यामुळे नाल्यामधील पाणी रस्त्यावरून वाहत आहे . आजस्थितीत जनतेला आणि विदयार्थ्यांना भरपूर त्रास होत आहे. नवीन रस्ते तर सोडाच किमान रस्त्यावरील खड्डे बुजवून आपल्या क्षेत्रातील जनतेला होणाच्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी माजी नगरसेवक श्री प्रशांत ताम्हण यांनी निवेदना द्वारे मुख्याधिकारी ब्रम्हपुरी तथा नगराध्यक्षा न प ब्रम्हपुरी यांना केली आहे .

तसेच घरकुल लाभार्थ्यांचे पैसे देणेबाबत सुद्धा मागणी करीत ब्रम्हपुरी नगरपरिषद क्षेत्रात घरकुल योजना २०१८-१९ मध्ये लागू करण्यात आली . काही जनतेनेला नगरपालीकेने कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगीतले त्याप्रमाणे घरकुल मंजूर करण्यात आली . नगरपरिषद आपल्या स्तरावर घरकुल मंजुर करून त्यांचे खात्यावर सर्वप्रथम ४०,००० / - रूपये देवून घरकुल बांधकाम करण्यास सांगीतले लाभार्थ्यांनी आपले घरकुल बांधकाम करण्याकरीता स्वतःचे घर सोडून किरायाच्या घराचा आश्रय घेतला . घरकुल नगरपरिषदेच्या देखरेखे खाली बांधण्यात आले . त्याकाळात नगरपालीकेने एक दोन चेक घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालीत . परंतू आज २ वर्षांच्या कालावधीत अजुनपर्यंत शेवटचा चेक देण्यात आला नसल्याने घरकुलाचे घरावरील छत टाकण्यात येवू शकले नाही . परीणामी घरकुल लाभार्थ्याना किरायाचे घरात राहावे लागत आहे . त्यांना घराचा किराया देता देता नाकी नऊ आले . लाभार्थ्यांना दुहेरी तिहेरी समस्याना तोड दयावे लागत आहे . किराया देणे , गजुरांचे पैसे देणे , याच परिवारातील पोरांचे शिक्षण , घर चालविणे कठीण झालेले आहे . तेव्हा नगरपरिषद ब्रम्हपुरीने या समस्याकडे लक्ष देवून लाभार्थ्यांच्या खात्यात ताबडतोब पैसे टाकावेत जेणेकरून त्यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण होतील , त्यांचे स्वतःचे घर पुर्ण होईल आणि त्यांच्या नगरपालीकेमुळे तयार झालेल्या समस्या दूर होतील आदी समस्याचे निवेदन श्री प्रशांत ताम्हण यांनी दिले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment